आज!
आज!
मी मुक्त चांदण्याला सजवून आज आले
आभाळ दाटलेले भिजवून आज आले
झाले कसे समर्पण काहीच का कळेना
आयुष्य रंगलेले घडवून आज आले
भीती मला नसावी या जीवनी कशाची
बिनधास्त राहण्याचे ठरवून आज आले
मी घेतला वसा तो क्रोधास त्यागण्याचा
प्रेमास जीवनी या फुलवून आज आले
चिंता नकोच आता येईल त्या दिसाची
सौख्यासवे क्षणांना जगवून आज आले
निलिमा कदम,गोरेगांव, मुंबई
दिनांक:- २२/०७/२०२२
Comments
Post a Comment