जातीमुळेच!
जातीमुळे घडे का संघर्ष मानवांचा
कोणासही कळेना उत्कर्ष जीवनांचा
खातात रोज माती जातीमुळेच सगळे
घेती हिरावुनी का आनंद या जनांचा
दररोज शेकडो का जाती जिवानिशी रे
झाला विनाश आता मानी अशा मनांचा
बाया मुले अशी का फिरतात सैरभैरी
झाला सुकाळ आहे वंगाळ दुर्जनांचा
गाडून आज टाकू सारे समाजकंटक
होईल साजरा बघ सण खास दुर्बलांचा
निलिमा कदम
Comments
Post a Comment