केवळ माझ्या हाती आहे
जीवन सारे सुखात जगणे,केवळ माझ्या हाती आहे
पुढे पुढे बघ चालत जाणे,केवळ माझ्या हाती आहे
आयुष्याचे काहीच दिवस,असतील जरी प्रचंड खडतर
त्यातुन सुखकर मार्ग काढणे,केवळ माझ्या हाती आहे
सुख दुःखाच्या येता राशी,सौख्याचे मग स्मरण ठेवुनी
दुःख विसरुनी जगत रहाणे,केवळ माझ्या हाती आहे
मनाप्रमाणे जरी न घडले, बाजुस सारुन गोष्टी साऱ्या
मनासारखे फक्त वागणे,केवळ माझ्या हाती आहे
अशक्य काही मुळीच नाही,विश्वास जरा ठेवा आता
शक्य तेवढे प्रयत्न करणे,केवळ माझ्या हाती आहे
निलिमा कदम
Comments
Post a Comment