गीत कोणी गात नाही


गीत कोणी गात नाही 


बंद दारे बघ मनाची का उघडता येत नाही

गोठलेल्या वेदनांना जाग काही येत नाही 


जखडुनी बस टाकले मी स्वैर माझ्या भावनांना 

मीच माझ्या जाणिवांना मग समजुनी घेत नाही


खूप काही आज आहे सांगणे सांगावयाचे

व्यर्थ असती बोल माझे जर कुणाची साथ नाही 


काल होते दाटलेले अंतरंगी प्रेम वेडे

आज माझ्या प्रेमवेड्या राजसाची भेट नाही


दाटुनी डोळ्यात आले स्वप्न जे मी पाहिलेले

भंगलेल्या दुःस्वरांनी गीत कोणी गात नाही

 


निलिमा कदम 




Comments