उरले नसे कुणाला कसलेच भान येथे


झाला खुशाल चेंडू सारा समाज येथे 

उरले नसे कुणाला कसलेच भान येथे


अविरत प्रयत्न करुनी जमले खरे न काही 

खोटेच वागणे बघ झाले प्रधान येथे


आक्रंदत्या मनाला समजावले कितीदा

दुःखास आज कुठला आहे विराम येथे


आकाश ठेंगणे का वाटे मला अनोखे

धरणीस भेटण्याला आले स्वतःच येथे


घेईन आज जवळी माझेच स्वप्न मोठे

एका क्षणात सारे संपेल दुःख येथे 


निलिमा कदम 






Comments