बोल माझे


शाब्दिक बोल माझे     

व्हावेत ते अबोली             

मी वाचली तुझ्या गं           

हृदयात ली रुडाली.  


ते बोल या मनीचे 

ओठावरी विराणी 

नाराज आज आहे

शब्दांतली कमानी


मी काय सावरावी

माझीच रे कहाणी

हळुवार होत आहे

माझ्याच या  सुरांनी 


            

निलिमा कदम, 

   

Comments