पाहिलेले मी तुला....

 


पाहिलेले मी तुला....

जगरहाटी सांगताना पाहिलेले मी तुला 
खेळ वेडा मांडताना पाहिलेले मी तुला

सात जन्माची कहाणी याच देही भोगली
गाठ पदरी बांधताना पाहिलेले मी तुला

साथ नसताना कुणाची जागली तू रात भर
भूक मारुन रांधताना पाहिलेले मी तुला

मीठ भाकर कोरडी पण आसभरल्या पापण्या 
सानुल्यांना वाढताना पाहिलेले मी तुला 

माय म्हणुनी तू स्वतःला होमकुंडी झोकले 
सर्व ईच्छा जाळताना पाहिलेले मी तुला 

निलिमा कदम 

Comments