मानव जगतो..


मानव जगतो प्रेमासाठी

स्वप्नामधल्या ध्येयासाठी 


सोपे जीवन कठीण करतो

केवळ खोट्या भासासाठी


साधे सोपे जीवन जगणे

अवघड नसते कोणासाठी 


अर्थशुन्य मग वादावादी 

खटाटोप बघ स्वार्थासाठी 


संपेल कधी का आसक्ती

जीवन सुंदर करण्यासाठी 


बागबगीचा अवतीभवती

सुरेल गाणे गाण्यासाठी 


जग जिंकावे आपण सारे  

निरागसपणे हसण्यासाठी

Comments