काटा कसा रूतावा?
नात्यांमधे अचानक,आला कसा दुरावा
परकेच वाटले मज,दिसला असा पुरावा
तारुण्य आज सरले, सरला प्रपंच सारा
मग खेळ जीवनाचा,मोहा विना सुटावा
नसते कधीच कोणी,उरले कुणाच साठी
आधार शोधण्याचा,असतो उगा दिखावा
प्रेमातल्या सुरांनी,गातेय गोड गाणी
फुलबाग सप्तरंगी,सहजीवनी फुलावा
ध्यानस्थ होत आहे,माझे शरीर सारे
रोमामध्ये मनाच्या, काटा कसा रुतावा?
निलिमा कदम

Comments
Post a Comment