पाहिले मी संपताना स्वप्न माझे भारलेले
ध्यासपुर्तीच्या क्षणाला मी स्वतःला मारलेले
पाहिले जे स्वप्न होते आपल्यांच्या सोबतीने
भान हरपुन वाट पाहत मी कधीची थांबलेले
खूप काही ठरवुनी का नेमके राहून गेले
होत गेले सर्व अवघड जे करावे वाटलेले
दैव सुध्दा घेत असते का परीक्षा कैक वेळा
संभ्रमाने मी उगाचच का अशी बघ गांजलेले
होत आहे बेसुऱ्या ह्या जीवनाचा अंत आता
आसवांना बांध घाली श्वास माझे संपलेले
निलिमा कदम
Comments
Post a Comment