अंदाज
अंदाज जरा चुकला माझा,आयुष्याला जगण्याचा
दृष्टीकोनच बदलुन गेला,आयुष्याला बघण्याचा
कोणी नाही कोणासाठी,नियम जगाचा असे खरा
मरणा नंतर सगळे जमती,फक्त दिखावा रडण्याचा
टिका टिप्पणी रोज चालते,करुनी आधी कुरघोडी
माणूस असे स्वतः स्वतःचा,गनिम एकला छळण्याचा
सगेसोयरे आणि सोबती,नाही कोणी दिमतीला
"मी" पण माझे सारे सरले,मार्ग मोकळा जाण्याचा
शेवटचा बघ देते सल्ला,आवर घाला क्रोधाला
निश्चय ठरवा मनापासुनी,क्षणा क्षणाला हसण्याचा
निलिमा कदम
वाह!
ReplyDelete