श्रावण बहरत खुलवत आला!
श्रावण बहरत खुलवत आला
तनामनाला फुलवत आला
छान छानसे रंग रंगुनी
नाचत मिरवत हसवत आला
हिरवी हिरवी मऊ सुतशी
शाल मखमली सजवत आला
बागेमधल्या फुलाफुलांच्या
संगत सोबत बरसत आला
सुवासिक फुले दरवळणारा
आसमंत हा विहरत आला
निलिमा कदम
श्रावण बहरत खुलवत आला
तनामनाला फुलवत आला
छान छानसे रंग रंगुनी
नाचत मिरवत हसवत आला
हिरवी हिरवी मऊ सुतशी
शाल मखमली सजवत आला
बागेमधल्या फुलाफुलांच्या
संगत सोबत बरसत आला
सुवासिक फुले दरवळणारा
आसमंत हा विहरत आला
निलिमा कदम
Comments
Post a Comment