Posts

उरले नसे कुणाला कसलेच भान येथे

झाला खुशाल चेंडू सारा समाज येथे  उरले नसे कुणाला कसलेच भान येथे अविरत प्रयत्न करुनी जमले खरे न काही  खोटेच वागणे बघ झाले प्रधान येथे आक्रंदत्या मनाला समजावले कितीदा दुःखास आज कुठला आहे विराम येथे आकाश ठेंगणे का वाटे मला अनोखे धरणीस भेटण्याला आले स्वतःच येथे घेईन आज जवळी माझेच स्वप्न मोठे एका क्षणात सारे संपेल दुःख येथे  निलिमा कदम 

काटा कसा रूतावा?

Image
नात्यांमधे अचानक,आला कसा दुरावा परकेच वाटले मज,दिसला असा पुरावा तारुण्य आज सरले, सरला प्रपंच सारा मग खेळ जीवनाचा,मोहा विना सुटावा  नसते कधीच कोणी,उरले कुणाच साठी आधार शोधण्याचा,असतो उगा दिखावा  प्रेमातल्या सुरांनी,गातेय गोड गाणी  फुलबाग सप्तरंगी,सहजीवनी फुलावा ध्यानस्थ होत आहे,माझे शरीर सारे रोमामध्ये मनाच्या, काटा कसा रुतावा?  निलिमा कदम 

विसावा क्षणाचा!

Image
विसावा क्षणाचा दिलासा सदाचा घराला स्वतःच्या  सहारा श्रमाचा नको भार वेड्या तुला मग फुकाचा नको दार खिडकी झरोका भ्रमाचा असू दे तुलाही निवारा स्वतःचा मिळू दे जगाला  सदा गोड वाचा अनंता तुला बघ  नमस्कार साचा  निलिमा कदम 
पाहिले मी संपताना स्वप्न माझे भारलेले ध्यासपुर्तीच्या क्षणाला मी स्वतःला मारलेले पाहिले जे स्वप्न होते आपल्यांच्या सोबतीने भान हरपुन वाट पाहत मी कधीची थांबलेले  खूप काही ठरवुनी का नेमके राहून गेले  होत गेले सर्व अवघड जे करावे वाटलेले  दैव सुध्दा घेत असते का परीक्षा कैक वेळा संभ्रमाने मी उगाचच का अशी बघ गांजलेले होत आहे बेसुऱ्या ह्या जीवनाचा अंत आता  आसवांना बांध घाली श्वास माझे संपलेले  निलिमा कदम 

मानव जगतो..

मानव जगतो प्रेमासाठी स्वप्नामधल्या ध्येयासाठी  सोपे जीवन कठीण करतो केवळ खोट्या भासासाठी साधे सोपे जीवन जगणे अवघड नसते कोणासाठी  अर्थशुन्य मग वादावादी  खटाटोप बघ स्वार्थासाठी  संपेल कधी का आसक्ती जीवन सुंदर करण्यासाठी  बागबगीचा अवतीभवती सुरेल गाणे गाण्यासाठी  जग जिंकावे आपण सारे   निरागसपणे हसण्यासाठी

बोल काही...

Image
 

बोल माझे

शाब्दिक बोल माझे      व्हावेत ते अबोली              मी वाचली तुझ्या गं            हृदयात ली रुडाली.   ते बोल या मनीचे  ओठावरी विराणी  नाराज आज आहे शब्दांतली कमानी मी काय सावरावी माझीच रे कहाणी हळुवार होत आहे माझ्याच या  सुरांनी               निलिमा कदम,