Posts

Showing posts from January, 2023

उरले नसे कुणाला कसलेच भान येथे

झाला खुशाल चेंडू सारा समाज येथे  उरले नसे कुणाला कसलेच भान येथे अविरत प्रयत्न करुनी जमले खरे न काही  खोटेच वागणे बघ झाले प्रधान येथे आक्रंदत्या मनाला समजावले कितीदा दुःखास आज कुठला आहे विराम येथे आकाश ठेंगणे का वाटे मला अनोखे धरणीस भेटण्याला आले स्वतःच येथे घेईन आज जवळी माझेच स्वप्न मोठे एका क्षणात सारे संपेल दुःख येथे  निलिमा कदम 

काटा कसा रूतावा?

Image
नात्यांमधे अचानक,आला कसा दुरावा परकेच वाटले मज,दिसला असा पुरावा तारुण्य आज सरले, सरला प्रपंच सारा मग खेळ जीवनाचा,मोहा विना सुटावा  नसते कधीच कोणी,उरले कुणाच साठी आधार शोधण्याचा,असतो उगा दिखावा  प्रेमातल्या सुरांनी,गातेय गोड गाणी  फुलबाग सप्तरंगी,सहजीवनी फुलावा ध्यानस्थ होत आहे,माझे शरीर सारे रोमामध्ये मनाच्या, काटा कसा रुतावा?  निलिमा कदम 

विसावा क्षणाचा!

Image
विसावा क्षणाचा दिलासा सदाचा घराला स्वतःच्या  सहारा श्रमाचा नको भार वेड्या तुला मग फुकाचा नको दार खिडकी झरोका भ्रमाचा असू दे तुलाही निवारा स्वतःचा मिळू दे जगाला  सदा गोड वाचा अनंता तुला बघ  नमस्कार साचा  निलिमा कदम 
पाहिले मी संपताना स्वप्न माझे भारलेले ध्यासपुर्तीच्या क्षणाला मी स्वतःला मारलेले पाहिले जे स्वप्न होते आपल्यांच्या सोबतीने भान हरपुन वाट पाहत मी कधीची थांबलेले  खूप काही ठरवुनी का नेमके राहून गेले  होत गेले सर्व अवघड जे करावे वाटलेले  दैव सुध्दा घेत असते का परीक्षा कैक वेळा संभ्रमाने मी उगाचच का अशी बघ गांजलेले होत आहे बेसुऱ्या ह्या जीवनाचा अंत आता  आसवांना बांध घाली श्वास माझे संपलेले  निलिमा कदम 

मानव जगतो..

मानव जगतो प्रेमासाठी स्वप्नामधल्या ध्येयासाठी  सोपे जीवन कठीण करतो केवळ खोट्या भासासाठी साधे सोपे जीवन जगणे अवघड नसते कोणासाठी  अर्थशुन्य मग वादावादी  खटाटोप बघ स्वार्थासाठी  संपेल कधी का आसक्ती जीवन सुंदर करण्यासाठी  बागबगीचा अवतीभवती सुरेल गाणे गाण्यासाठी  जग जिंकावे आपण सारे   निरागसपणे हसण्यासाठी

बोल काही...

Image
 

बोल माझे

शाब्दिक बोल माझे      व्हावेत ते अबोली              मी वाचली तुझ्या गं            हृदयात ली रुडाली.   ते बोल या मनीचे  ओठावरी विराणी  नाराज आज आहे शब्दांतली कमानी मी काय सावरावी माझीच रे कहाणी हळुवार होत आहे माझ्याच या  सुरांनी               निलिमा कदम,     

जातीमुळेच!

जातीमुळे घडे का संघर्ष मानवांचा कोणासही कळेना उत्कर्ष जीवनांचा खातात रोज माती जातीमुळेच सगळे घेती हिरावुनी का आनंद या जनांचा दररोज शेकडो का जाती जिवानिशी रे झाला विनाश आता मानी अशा मनांचा बाया मुले अशी का फिरतात सैरभैरी झाला सुकाळ आहे वंगाळ दुर्जनांचा गाडून आज टाकू सारे समाजकंटक होईल साजरा बघ सण खास दुर्बलांचा  निलिमा कदम 

श्रावण बहरत खुलवत आला!

Image
श्रावण बहरत खुलवत आला तनामनाला फुलवत आला छान छानसे रंग रंगुनी नाचत मिरवत हसवत आला हिरवी हिरवी मऊ सुतशी शाल मखमली सजवत आला बागेमधल्या फुलाफुलांच्या संगत सोबत बरसत आला सुवासिक फुले दरवळणारा  आसमंत हा विहरत आला  निलिमा कदम 

प्रवासी...

Image
 

गीत कोणी गात नाही

गीत कोणी गात नाही  बंद दारे बघ मनाची का उघडता येत नाही गोठलेल्या वेदनांना जाग काही येत नाही  जखडुनी बस टाकले मी स्वैर माझ्या भावनांना  मीच माझ्या जाणिवांना मग समजुनी घेत नाही खूप काही आज आहे सांगणे सांगावयाचे व्यर्थ असती बोल माझे जर कुणाची साथ नाही  काल होते दाटलेले अंतरंगी प्रेम वेडे आज माझ्या प्रेमवेड्या राजसाची भेट नाही दाटुनी डोळ्यात आले स्वप्न जे मी पाहिलेले भंगलेल्या दुःस्वरांनी गीत कोणी गात नाही   निलिमा कदम 

चंद्रमा...

Image
 

परिपाठ जीवनाचा !

Image
 
Image
 

मित्रा

Image
मित्रा  माझ्या सवे सुखाने, जगशील काय मित्रा? माझाच हात हाती, धरशील काय मित्रा? स्वार्थी जगात साऱ्या, नाही कुणी कुणाचा  जगण्यास तू मजेने, शिकशील काय मित्रा? बघ कोवळ्या फुलांचा, दिसतोय साज सुंदर सोडू नकोस आशा, हसशील काय मित्रा? नाही कधीच हरला, तू कोणत्या भयाने त्वेषात तू नव्याने, लढशील काय मित्रा? आहोत मित्र आपण, बघ भांडतो जगाशी माझ्याच सोबतीने, असशील काय मित्रा?  आहेत बोल खोटे, नादान बांधवांचे असतो बनाव मोठा, बघशील काय मित्रा?  आता कधी न व्हावी, बघ यातना मनाला  निर्धार खास आता, करशील काय मित्रा?

गीत कोणी गात नाही

गीत कोणी गात नाही  बंद दारे बघ मनाची का उघडता येत नाही गोठलेल्या वेदनांना जाग काही येत नाही  जखडुनी बस टाकले मी स्वैर माझ्या भावनांना  मीच माझ्या जाणिवांना मग समजुनी घेत नाही खूप काही आज आहे सांगणे सांगावयाचे व्यर्थ असती बोल माझे जर कुणाची साथ नाही  काल होते दाटलेले अंतरंगी प्रेम वेडे आज माझ्या प्रेमवेड्या राजसाची भेट नाही दाटुनी डोळ्यात आले स्वप्न जे मी पाहिलेले भंगलेल्या दुःस्वरांनी गीत कोणी गात नाही  निलिमा कदम 

सखी

Image
 

केवळ माझ्या हाती आहे

जीवन सारे सुखात जगणे,केवळ माझ्या हाती आहे पुढे पुढे बघ चालत जाणे,केवळ माझ्या हाती आहे  आयुष्याचे काहीच दिवस,असतील जरी प्रचंड खडतर त्यातुन सुखकर मार्ग काढणे,केवळ माझ्या हाती आहे  सुख दुःखाच्या येता राशी,सौख्याचे मग स्मरण ठेवुनी  दुःख विसरुनी जगत रहाणे,केवळ माझ्या हाती आहे  मनाप्रमाणे जरी न घडले, बाजुस सारुन गोष्टी साऱ्या  मनासारखे फक्त वागणे,केवळ माझ्या हाती आहे  अशक्य काही मुळीच नाही,विश्वास जरा ठेवा आता शक्य तेवढे प्रयत्न करणे,केवळ माझ्या हाती आहे  निलिमा कदम

निश्चय....

Image
 

माझी आई

Image
 

अंदाज

अंदाज जरा चुकला माझा,आयुष्याला जगण्याचा दृष्टीकोनच बदलुन गेला,आयुष्याला बघण्याचा कोणी नाही कोणासाठी,नियम जगाचा असे खरा मरणा नंतर सगळे जमती,फक्त दिखावा रडण्याचा  टिका टिप्पणी रोज चालते,करुनी आधी कुरघोडी माणूस असे स्वतः स्वतःचा,गनिम एकला छळण्याचा सगेसोयरे आणि सोबती,नाही कोणी दिमतीला "मी" पण माझे सारे सरले,मार्ग मोकळा जाण्याचा  शेवटचा बघ देते सल्ला,आवर घाला क्रोधाला  निश्चय ठरवा मनापासुनी,क्षणा क्षणाला हसण्याचा निलिमा कदम 

पाहिलेले मी तुला....

  पाहिलेले मी तुला.... जगरहाटी सांगताना पाहिलेले मी तुला  खेळ वेडा मांडताना पाहिलेले मी तुला सात जन्माची कहाणी याच देही भोगली गाठ पदरी बांधताना पाहिलेले मी तुला साथ नसताना कुणाची जागली तू रात भर भूक मारुन रांधताना पाहिलेले मी तुला मीठ भाकर कोरडी पण आसभरल्या पापण्या  सानुल्यांना वाढताना पाहिलेले मी तुला  माय म्हणुनी तू स्वतःला होमकुंडी झोकले  सर्व ईच्छा जाळताना पाहिलेले मी तुला  निलिमा कदम 

शोध

Image
 

आज!

 आज! मी मुक्त चांदण्याला सजवून आज आले आभाळ दाटलेले भिजवून आज आले झाले कसे समर्पण काहीच का कळेना आयुष्य रंगलेले घडवून आज आले भीती मला नसावी या जीवनी कशाची  बिनधास्त राहण्याचे ठरवून आज आले मी घेतला वसा तो क्रोधास त्यागण्याचा प्रेमास जीवनी या फुलवून आज आले चिंता नकोच आता येईल त्या दिसाची सौख्यासवे क्षणांना जगवून आज आले निलिमा कदम,गोरेगांव, मुंबई दिनांक:- २२/०७/२०२२